महिलांसाठी सरकारची आणखी एक मोफत योजना , जाणून घ्या सविस्तर माहिती

Published On: June 15, 2026
Sarkari Yojana New

Sarkari Yojana New : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक छान योजना सुरू केली आहे. ही योजना गरीब आणि गरजू महिलांना त्यांच्या स्वतःच्या व्यवसायासाठी मदत करते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार खूप चांगला झाला आणि महिलांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला.

या योजनेत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाते. ही गिरणी मिळाल्याने त्या स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात आणि घरखर्चासाठी पैसे कमवू शकतात. सरकारचा हेतू आहे की महिला कुणावरही अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय सुरु कराव्यात आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाव्यात.

योजनेत सरकार किती मदत करते?

जर गिरणीची किंमत १०,००० रुपये असेल, तर सरकार ९०% म्हणजे ९,००० रुपये देते. महिलेला फक्त १,००० रुपये द्यावे लागतात. त्यामुळे कमी पैसे खर्च करून व्यवसाय सुरू करणे शक्य होते.

कोण अर्ज करू शकतो?

1) महाराष्ट्रातील महिला असावी.
2) अनुसूचित जाती किंवा जमातीतील असावी.
3) वय १८ ते ६० वर्षे दरम्यान असावे.
4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.२० लाखांपेक्षा कमी असावे.
5) ग्रामीण भागातील महिलांना आधी संधी दिली जाते.

अर्जासाठी काय काय कागदपत्रे लागतील?

आधार कार्ड ,जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक, गिरणी खरेदीसाठी कोटेशन

योजनेचे फायदे

गिरणी मिळाल्यानंतर महिला गावात किंवा घराजवळ पिठ दळण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात. गावात अशा सेवा कमी असल्याने लोक त्यांच्या कडे येतात. त्यामुळे रोज उत्पन्न मिळते. व्यवसाय चांगला झाल्यास मोठ्या प्रमाणात पिठ तयार करून विक्री करू शकतात आणि अधिक पैसे मिळवू शकतात.

शेतकरी

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment