वृतसंस्था :- अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ५०० रुपयांची खास नोट जारी करण्यात येणार आहे. या नोटेवर महात्मा गांधी यांच्याऐवजी श्रीरामाचा फोटो असेल, असा दावा केला जात आहे. मात्र हा दावा खोटा असून अशी कोणतीही नोट जारी केली जाणार नसल्याचे फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट झाले आहे. तरी कुणी अफवांवर विश्वास ठेवू नये. व असे फेक मेसेज व्हायरल करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
खरंच असतील का..? ५००च्या नवीन नोटेवर श्रीराम अन् धनुष्यबाण? वाचा सविस्तर बातमी..
By शेतकरी
Published On: February 18, 2024









